20 April 2025 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर खिळे लावलेल्या रॉडने हल्ला केल्याचं उघड

China, India, Nail Rods

लडाख, 18 जून : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.

सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनआधी जे जवान आपल्या घरी गेले होते त्यांना पुन्हा बोलवून घेण्यात आलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या बैठकांमधून चीनला अद्दल घडवण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

त्याआधी 1967 मध्ये नाथु ला जवळ अशा प्रकारची घटना समोर आली होती, ज्यावेळी सीमेवर दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांशी भिडलं होतं. सिक्कीममधील झटापटीमध्ये भारताची नियंत्रण रेषेवरील स्थितीमध्ये मजबुती हे महत्त्वाचं कारण होतं. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारत नाथु ला सीमेवर आपली स्थिती मजबूत करत होता. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला. 1967 मध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते. त्यावेळी भारतीय सैन्यानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. यामध्ये चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान झालं होतं. भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धात चीनचे जवळपास ४०० सैनिक मारले गेले होते.

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या घटनेत चीनने ठरवून हल्ला केल्याचं समोर आलं आहे. भारतीय सैनिकांकडे कोणतीही हत्यारं नसताना चिनी सैनिकांकडे खिळे लावलेले रॉड होते आणि त्याचाच वापर त्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी केला. परिणामी भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणावर गंभीरपणे जखमी झाले आणि उपचार मिळण्याआधीच त्यांना वीर मरण आले हे स्पष्ट झालं आहे.

 

News English Summary: While the Indian soldiers did not have any weapons, the Chinese soldiers had rods nailed and used them to attack the Indian soldiers. As a result, a large number of Indian soldiers were seriously injured and it is clear that they died heroically before receiving treatment.

News English Title: Chinese soldiers had rods nailed and used them to attack the Indian soldiers News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या