24 December 2024 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

सोनू सुदच्या मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांचा शिवसेनेवर निशाणा

Circus In Maharashtra, Union Minister Rajnath Singh

नवी दिल्ली, ८ जून: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारकडून हवी ती सगळी मदत पुरवली गेली असली तरीही असमन्वयामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा आदर्श घ्यावा, अशी टीका केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच त्यांनी महाराष्ट्रातील सरकारला सर्कसची उपमा दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. कोरोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा प्रश्नही राजनाथ सिंग यांनी उपस्थित केला.

एवढंच नाही तर सोनू सुदच्या मुद्द्यावरुनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अभिनेता सोनू सुद लोकांना चांगली मदत करतोय तर शिवसेनेला तेही बघवत नाही त्याच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेनेला काय झालंय? आम्ही पाहात होतो ती बाळासाहेबांची शिवसेना हीच आहे का? असा प्रश्न आम्हाला पडतो. आमच्यासोबत शिवसेनेने विधानसभेची निवडणूक लढली त्यानंतर आम्हाला धोका दिला. आम्ही धोका दिला हरकत नाही मात्र आम्ही धोका कुणालाही देऊ शकत नाही असाही टोला राजनाथ सिंग यांनी लगावला.

 

News English Summary: The number of corona patients is increasing rapidly in Maharashtra. Despite all the help provided by the central government, coronary heart disease is on the rise in Maharashtra. Therefore, Maharashtra should follow the example of Uttar Pradesh and Karnataka, said Union Defense Minister Rajnath Singh.

News English Title: Circus In Maharashtra Government Says Union Minister Rajnath Singh News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x