5 November 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

CAB २०१९: ईशान्य भारत पेटला; त्रिपुरात व आसाममध्ये लष्कराला पाचारण

Citizenship Amendment Bill 2019, Violence in Assam Tripura Military on Alert, Amit Shah

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. दरम्यान, लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात सर्वत्र असंतोष व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्रिपुरात लष्कराला पाचारण करण्यात आले; तर या विरोधाचे केंद्र ठरलेल्या आसाममध्ये लष्कराला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय ईशान्य भारतात निमलष्करी दलांचे ५ हजार जवान पाठवण्यात आले आहेत. त्रिपुराच्या कंचनपूर व मनु येथे प्रत्येकी एक कॉलम तैनात करण्यात आला असून, आसाममधील बोंगाईगाव व दिब्रुगड येथे काही अनुचित घटना घडल्यास सज्ज राहण्यास एका कॉलमला सांगण्यात आले आहे, असे लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थी व युवक अग्रभागी आहेत. आसाममध्ये सचिवालयाजवळ आंदोलक विद्यार्थी व पोलीस यांच्यात चकमक उडाली. सचिवालयाच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जमावाला ५०० मीटर अंतरावर रोखून धरण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड पाडताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमारही केला. तेव्हा विद्यार्थ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा पोलिसांवरच फेकल्या. दिब्रुगढमध्येही पोलीस व आंदोलकांमध्ये चकमक झाली. च्तेथील दगडफेकीत एक पत्रकार जखमी झाला. आंदोलनामुळे ईशान्य भारतात धावणाऱ्या १४ रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.

ईशान्य भारतातला काही प्रदेशांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये केला आहे. हे प्रदेश CAB च्या कक्षेबाहेर आहेत. आसाममध्ये आधीच NRC अंतर्गत नागरिकत्व नोंदणी मोहीम राबवण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रं दाखवून नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्या व्यक्ती बेकायदेशीर नागरिक ठरल्या. त्यांना घुसखोर ठरवण्यात येईल. याउलट आता बांगलादेशातून आणि इतर सीमेजवळच्या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना त्या त्या राज्यात अधिकृत नागरिकत्व घेता येईल. त्यातून या प्रदेशाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title:  Citizenship Amendment Bill 2019 after Rajya Sabha Approved Citizenship Bill Violence in Assam Tripura Military on Alert

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x