22 December 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

परिस्थिती बिघडली | दिल्लीत आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही | 6 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

Delhi Lockdown

नवी दिल्ली, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाउन लावत असल्याची माहिती दिली. सोमवारी रात्री १० पासून लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान यावेळी अरविंज केजरीवाल यांनी कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका असं आवाहन केलं.

दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही असं लक्षात आळं आहे. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकानं सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

हा निर्णय अत्यंत दु:खानं घ्यायला लागत आहे. आपलं दिल्ली एक कुटुंब आहे. कुटुंबावर संकट आलं की सगळे मिळून त्याचा सामना करतात. आताही आपण सर्व मिळून याचा सामना करु,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: Chief Minister Arvind Kejriwal has announced a six-day lockdown in Delhi. Arvind Kejriwal, while addressing the people of the state, informed that lockdown is being imposed. The lockdown will start from 10 pm on Monday. Meanwhile, Arvind Kejriwal appealed to no one to leave Delhi.

News English Title: CM Arvind Kejriwal has announced a six-day lockdown in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x