राजस्थानच्या राज्यपालांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशनाची विनंती फेटाळली

जयपूर, २४ जुलै : राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी म्हटले आहे, की सध्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे आमदार कोरोना कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. अशात विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. अशा स्थितीत, तत्काळ विधानसभा अधिवेश बोलावण्याच्या आणि बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून, अशोक गेहलोत सरकार सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
तत्पूर्वी, राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाराच्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. हा सत्तासंघर्षाचा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकांना पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयात पायलट गटाने आव्हान दिलं होतं. यावर आज राजस्थान उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पायलट गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
राजस्थानात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात हायकोर्टाच्या निर्णयानं आणखी भर पडली आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेल्यांना शुक्रवारी या प्रकरणाचा छडा लागेल असं वाटत होतं. पण तसे झाले नाही. सचिन पायलट गटाकडून या खटल्यात केंद्र सरकारला पक्षकार करा म्हणून अर्ज करण्यात आला त्यामुळे आता केंद्र सरकारची बाजूही हायकोर्ट ऐकून घेणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पायलट गटाला दिलेल्या नोटिशीबाबतही जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
News English Summary: Chief Minister Ashok Gehlot said that he has demanded the convening of an assembly session. However, the governor has not made any decision. However, now news has come that Governor Kalraj Mishra, quoting Corona, has said that it would not be appropriate to convene an assembly session.
News English Title: CM Ashok Gehlot demands to governor Kalraj Mishra for assembly session News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC