15 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

तुमच्या ताफ्यात एवढ्या मीडियाच्या गाड्या का होत्या | ते सर्व नियोजित होतं का? - ममता बॅनर्जी

CM Mamta Banerjee, West Bengal, BJP President J P Nadda

कोलकत्ता, ११ डिसेंबर: गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असं देखील ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र समाज माध्यमांवर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केलाय. तृणमूल काँग्रेसनं हा हल्ला घडवून आणल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलाय. तर तृणमूल काँग्रेसनं मात्र हा हल्ला ‘बनावट’ असल्याचा दावा केलाय. राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात, तरीही भारतीय जनता पक्ष नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो, असाही प्रश्न या निमित्तानं मोईत्रा यांनी उपस्थित केलाय.

दुसरीकडे नड्डा यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि त्यामागे जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्यांबद्दल देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी शंका उपस्थित केलीय. “तुमच्या ताफ्यामागे ५० गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांचा गाड्या का होता? तिथे कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? तुम्ही खूप हुशार आहात,” असं ममता यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना म्हटलं आहे.

 

News English Summary: Chief Minister Mamata Banerjee also raised serious doubts about the number of vehicles in Nadda’s convoy and the media vehicles following him. “Why were there 50 vehicles behind your convoy? Why were bikes and media cars? Who was standing there? Who threw the stone? Was it all planned? You are very smart, ”said Mamata while criticizing BJP.

News English Title: CM Mamta Banerjee angry on BJP J P Nadda visit in West Bengal News updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x