4 February 2025 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला, 85 हजारांचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या Adani Power Share Price | तज्ज्ञांकडून अदानी पॉवर शेअरला 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Income Tax Return | स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला होतो, जाणून घ्या नव्या आणि जुन्या टॅक्स रिजीममधील मर्यादा किती आहे IPO GMP | स्वस्त आयपीओ आला रे, IPO शेअरचा ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल SBI Home Loan | SBI बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज हवे असेल तर, महिन्याला किती पगार असायला हवा इथे जाणून घ्या Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
x

नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; काँग्रेसची आरबीआय'च्या दिल्ली कार्यालयाबाहेर जोरदार निर्दर्शनं

Demonetization, Congress Protest Outside RBI delhi office

नवी दिल्ली: नोटबंदीच्या निर्णयाला आज ३ वर्ष पूर्ण झाली असून काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यालाच अनुसरून दिल्लीत नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे प्रियांका गांधी नोटबंदीवरून मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या की, नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.

त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारने नोटाबंदी सर्व आजारांवरील एक इलाज असल्याच्या सरकारच्या दाव्यावर देखील प्रश्नचिन्हे उपस्थित होतं आहे. नोटबंदी ही एक आपत्ती होती, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था नष्ट झाली. आता या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते मंडळींनी देशातील आर्थिक मंदीला नोटाबंदीचा निर्णय जवाबदार असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे आणि त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी देखील प्रहार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी नोटबंदी हा प्रमुख मुद्दा केला होता. काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की उत्पादन क्षेत्रातील विकास दर ०.६ टक्क्यांनी स्थिर राहतो हे त्रासदायक आहे. त्यामुळे स्पष्टपणे सूचित होतं की भारतीय अर्थव्यवस्था अद्याप नोटाबंदीपासून मुक्त झाली नाही आणि त्यात त्वरीत जीएसटी लागू केला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x