23 February 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

काँग्रेसमध्ये असाल तर हरयाणातील भाजपाकडून मिळणारं आदरातिथ्य सोडा - रणदीप सुरजेवाला

Congress, Sachin Pilot, Haryana BJP

नवी दिल्ली, १५ जुलै : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.

“आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. भाजपामध्ये प्रवेश करणार का ? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. आपण लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून ऐकली आहे. त्यांना भाजपात जायचं नाही. जर त्यांची ही भूमिका असेल आणि त्यांना काँग्रेसमध्ये परत यायचं असेल, तर त्यांनी हरयाणातील भाजपा सरकारकडून केलं जाणारं आदरातिथ्य सोडून तातडीनं जयपूरला परतावं,” असं आवाहन काँग्रेसनं सचिन पायलट यांना केलं आहे.

 

News English Summary: If he wants to return to the Congress, he should leave the hospitality extended by the BJP government in Haryana and return to Jaipur immediately, ”the Congress has appealed to Sachin Pilot.

News English Title: Congress Appeal To Sachin Pilot To Come Back In Party News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x