28 April 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट
x

सेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक

Congress, Shivsena, NCP

पुणे : राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे.

शरद पवार यांनी दोन्ही काॅंग्रेस एकत्रित निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप काहीच ठरले नसल्याचे सांगत पटेल यांनी याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय़ होणार असल्याचे नमूद केले. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासमोर कोणत्याही अटी ठेवण्यात आल्या नव्हत्या, असेही स्पष्ट केले.

निवडणुकीच्या निकालातून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. पण आता उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा करू. चर्चेनंतर निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलंय. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी खर्गे बोलत होते.

दुसरीकडे राऊत म्हणाले, की आम्हाला जनतेचा अपमान केला म्हणणाऱ्यांचा काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याशी काय लव्ह जिहाद होता? काँग्रेस, राष्ट्रवादी या मातीतले पक्ष आहेत ते काय पाकिस्तानचे नाहीत. हे महाराष्ट्र राज्य आमचे आहे. या राज्यात कुठ्लही आस्थिरता येता कामा नये. राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाली कोणही सत्ता आपल्या ताब्यात ठेवू पाहत असेल तर त्याला तिन्ही पक्षाचा विरोध राहील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या हव्यासापोटी एकत्र आलेलो नाही. शरद पवार आणि काँग्रेस नेते या सर्वांची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सगळ्याच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाने संवाद सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी कसोटीचा क्षण आहे. या दोन्ही पक्षांशी संवाद सुरु आहे.

राज्यपालांनी आम्हाला कमी वेळ दिला आहे. तरीही आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. शिक्षण, आरोग्य, शेती या आधारे सरकार निर्माण होत असेल तर सरकार बनविण्यास तयार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony