17 April 2025 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

ही घ्या यादी | काँग्रेसने ध्यानचंद यांच्या नावे काय केलं | पणवतीने त्यांच्या नावे फक्त राजकारण केलं - अलका लांबा

Congress leader Alka Lamba

नवी दिल्ली, ०६ ऑगस्ट | टोकियो ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा जोरदार पीआर सुरु केल्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०२१ मधील केंद्रीय बजेटमध्ये मोदी सरकारने यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही तब्बल 230 कोटी 78 लाख रुपयांची म्हणजे स्पोर्ट्स वार्षिक बजेट रक्कम तब्बल 8.16 टक्क्यांनी घटवली आहे. त्यावरून खेळ आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या संवादाचे व्हिडिओ कंटेंट प्रसार माध्यमांकडे पोहोचवून स्वतःचा जोरदार PR केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संसदेच्या चर्चेत सहभागी न होणारे मोदी कार्यालयीत खेळाडूंच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतंय. मुळात तो ऑडिओ काल असताना मोदींच्या कार्यालयातील आणि टोकियोतील स्पर्धकांमध्ये एक टीम याच PR साठी काम करत असल्याचं म्हटलं जातंय. अगदी आजच उदाहरण म्हणजे मोदींनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या खिलाडू वृत्तीची तारीफ केली. फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत. आणि तेच कन्टेन्ट माध्यमांमध्ये पोहोचविण्यात येत आहेत.

याच विषयाला अनुसरून काँग्रेसच्या नेत्या अलका लांब यांनी प्रसार माध्यमांवर काँग्रेसने मेजर ध्यानचंद यांच्या नावाचा सन्मान करताना देशात नेमकं काय काय केलं त्याची यादीच दिली आहे. मात्र त्या सोबत मोदींना थेट ‘पणवती’ संबोधत त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या नावाकडून केवळ राजकारण केल्याचा घणाघात केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Alka Lamba slams PM Narendra Modi over Major Dhyanchand politics news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या