22 April 2025 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE
x

राजा एवढाही फकीर निवडू नका की कोणताही व्यापारी त्याला स्वतःच्या खिशात ठेवेल

Navjot Singh Sidhu, PM Narendra Modi, Farmers protest

नवी दिल्ली, २३ डिसेंबर: दिल्लीत काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असून, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मोदी सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. सध्या देशाचं लक्ष लागलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. Farmers are still protesting in Delhi.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर ताशेरे ओढणं सुरुच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. Congress Leader Navjot Singh Sidhu slams PM Narendra Modi over farmers protest.

नवजोत सिंह सिद्धू यांनी एप्रिल 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसोबतचे फोटो शेअर केले होते. तेव्हाही “राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले” हेच कॅप्शन सिद्धूंनी दिले होते. आता उत्तर भारतात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धूंनी पुन्हा मोदींवर प्रहार केला आहे.

 

News English Summary: Against the backdrop of the ongoing farmers’ agitation in the capital Delhi, Congress leaders continue to lash out at the Modi government. Congress leader Navjot Singh Sidhu indirectly targeted Prime Minister Narendra Modi, saying that the king should not choose so many saints (fakirs) that any businessman would keep him in his pocket. It is noteworthy that even in 2019, Sidhu had directly attacked Modi, quoting the same sentence of Acharya Chanakya.

News English Title: Congress Leader Navjot Singh Sidhu slams PM Narendra Modi over farmers protest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या