5 November 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम

India corona pandemic

नवी दिल्ली, ०९ मे | जगप्रसिद्ध आरोग्य आणि संशोधन मॅगझीन ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आक्रमक झाले असून थोडी जरी लाज शिल्लक असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दोन ट्विट करून केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी जरी लाज बाकी असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्याने त्वरीत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे.

दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सुनावलं आहे. राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाउन परिणाम कारक नसल्याचं सांगत झोपेतून जागे व्हा, अशी संतप्त टीका आयएमएने केली आहे.

केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाउन करण्याचा सल्ला आयएमएने दिला होता. मात्र, त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला संघटनेनं चांगलंच सुनावलं आहे. आयएमने एक प्रसिद्धी पत्रक काढलं असून, केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी केंद्र सरकारला करोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही सल्ला दिला होता. मात्र, तो सरकारने कचराकुंडीत फेकला, असा आरोप संघटनेनं केला आहे.

 

News English Summary: Congress leader P. Chidambaram has attacked the Modi government at the Center with two tweets. The government should issue a public apology to the country if there is any shame left after today’s article in the Lancet. He also demanded that the Union Health Minister should resign immediately. Chidambaram has done.

News English Title: Congress leader P. Chidambaram has demanded resignation of union health minister Hashvardhan news updates.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x