7 January 2025 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही
x

तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता | आता दुसरं युद्ध - चिदंबरम

P Chidambaram

नवी दिल्ली, १२ एप्रिल: देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावरून आता माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्विट करत लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्द अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी मोदींनी लॉकडाउन जाहीर करताना २१ दिवसांत युद्ध जिंकू अशी घोषणा केली होती, त्याचीही आठवण करुन दिली.

माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं…दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?”. पुढे ते म्हणाले आहेत, “पंतप्रधानांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे १८ दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?”.

 

News English Summary: Former Finance Minister P Chidambaram said in a tweet, “Once the government says, the vaccination campaign is a celebration. The next day he says, “There is another war.” What exactly is it? ”. He further said, “When the Prime Minister announced the first lockdown, he claimed to have won the war in 21 days. This time he compared it to a battle in the Mahabharata which was won in 18 days. What happened to him? ”.

News English Title: Congress leader P Chidambaram slams Modi govt over Corona vaccine Utsav news updates.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x