19 April 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि गेन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांचे काय? - प्रियांका गांधी

Congress Leader Priyanka Gandhi, Gangster Vikas Dubey encounter, Yogi government

कानपूर, १० जुलै : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

आज सकाळी ७.१५ ते ७.३५ च्या दरम्यान उत्तर प्रदेशची एसटीएफ टीमसोबत झालेल्या झटापटीत मारला गेला. विकास दुबेने पोलिसांची बंदुक घेण्याच्या प्रयत्न केला. या झटापटीत एका गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामध्ये तो मारला गेला. एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सुद्धा याबाबत एक ट्विट केले आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. विकास दुबे एन्काऊंटरनंतर त्यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. “गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी गुरुवारी याबाबत एक ट्विट केलं होतं. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला असं त्यांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: Priyanka Gandhi tweeted from her Twitter account. He has posed a question after the Vikas Dubey encounter. “Criminals are gone, but what about crime and those who protect them?” That is what Priyanka has said.

News English Title: Congress Leader Priyanka Gandhi questions gangster Vikas Dubey encounter reprimands yogi government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या