22 February 2025 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

निवडणूक आयोगाची गाडी खराब | भाजपाची नियत खराब | लोकशाहीची अवस्था खराब - राहुल गांधी

Congress leader Rahul Gandhi, BJP, Election commission, Assam EVM machines

नवी दिल्ली, ०२ एप्रिल: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.

दरम्यान, आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे सरकार पुरस्कृत वृत्त वाहिन्या आणि निवडणूक अयोग्य हास्यास्पद कारणं देत असल्याने समाज माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दात भाजप आणि निवडणूक आयोगाचा समाचार घेतलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी ट्विट करताना म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नियत खराब, लोकशाहीची अवस्था खराब..

 

News English Summary: Following this issue, Congress leader Rahul Gandhi has briefly covered the BJP and the Election Commission. In this regard, Rahul Gandhi tweeted, “Election Commission’s car is bad, BJP’s destiny is bad, situation of democracy is bad”.

News English Title: Congress leader Rahul Gandhi slams BJP and election commission over Assam EVM machines found with BJP leader news updates.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x