केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा

नवी दिल्ली, १६ एप्रिल: देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
भारतात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 15 लाखांच्या पार झाली आहे. आता येथे 15 लाख 63 हजार 588 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश आहे. यावरुन आपण देशातील कोरोनाच्या कहराचा अंदाज लावू शकतो. या यादीमध्ये पुणे टॉपवर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी परिस्थिती आहे की, देशात जवळपास 120 जिल्ह्यांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांचा तुटवडा आहे. आता देशाला केंद्राकडून मोठ्या योजनांची अपेक्षा आहे. मात्र पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्यानंतर असं निदर्शनास आलं होतं की तो जाहीर करण्यापूर्वी कोणताही एक्झिट प्लान आखण्यात आला नव्हता. आता दुसरी लाट आल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्या लाटेत मोदी सरकारने केलेल्या घटनाक्रमवार भाष्य करत केंद्राची खिल्ली उडवली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे.
केंद्र सरकार की कोविड रणनीति-
स्टेज 1- तुग़लक़ी लॉकडाउन लगाओ।
स्टेज 2- घंटी बजाओ।
स्टेज 3- प्रभु के गुण गाओ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 16, 2021
News English Summary: Rahul Gandhi tweeted, “Central government’s cowardly strategy – first stage – to impose Tughlaq lockdown. The second stage – ringing the bell. The third stage is to sing the praises of God.
News English Title: Congress leader Rahul Gandhi target Modi govt after second wave of covid 19 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK