लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल मी आधीच सतर्क केलं होतं | त्यांना ते काही महिन्यांनंतर कळलं - राहुल गांधी
नवी दिल्ली, ३ एप्रिल: जगभरात कोरोना संकट कोसळलं तसं ते गेल्यावर्षी भारतातही आलं. त्याच्या काही दिवसांनी मोदी सरकारने देशवासियांना कोणतीही कल्पना न देता आणि कोणतीही पूर्वतयारी न करता थेट लॉकडाऊनची घोषणा केली होती. अगदी आरोग्य यंत्रणांबाबतही तोच प्रकार अनुभवायला मिळाला होता. त्याचे गंभीर परिणाम देशाला भिगावे लागले. त्याचा मोठा परिणाम म्हणजे बेरोजगारी प्रचंड वाढली आणि आर्थिक पीछेहाट होण्यात इतिहास रचले गेले. आज पुन्हा तीच परिस्थिती देशावर ओढवली आहे आणि त्यामुळे अनेक विषय पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांना नुकतीच एक ऑनलाईन मुलाखतीत दिली. त्यादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान असतो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. मी विकास केंद्रीत राजकारणापेक्षा रोजगार उपलब्धतेवर भर दिला असता, आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याचसोबत उत्पादन क्षमता वाढवणे, आणि रोजगाराच्या संधी देणे यासाठी सर्वकाही केले असते.
कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल राहुल गांधी म्हंटले की, मी लॉकडाऊनच्या सुरुवातीला सांगितलं शक्तीचं विकेंद्रीकरण केलं जावं, परंतु काही महिन्यानतर केंद्र सरकारला ही गोष्ट कळाली, तोपर्यंत भरपूर नुकसान झालं होतं, आता फक्त एकच उपाय आहे की, लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यासाठी काँग्रेस न्याय योजनेचा विचार करत आहे.
सत्ताधाऱ्यांनी भारताच्या संघटनात्मक व्यवस्थेवर पूर्णपणे कब्जा केला आहे. २०१४ च्या पूर्वी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष काम करत होते, आता त्यात बदल झाला आहे, ज्या संस्थांनी निष्पक्ष राजकीय लढाईचं समर्थन करायला हवं, आता त्या करत नाहीत. ज्यांना लोकांचं संरक्षण करायला हवं, त्या संस्था तसं करत नाहीत. भारतात काय होतं, त्यावर अमेरिकन सरकार कोणतीही प्रतिक्रिया देत नाही असंही राहुल गांधी म्हणाले.
News English Summary: Congress leader Rahul Gandhi recently gave an online interview to former US Ambassador Nicholas Burns. Meanwhile, Rahul Gandhi said, “If I were the Prime Minister, my focus would be on providing employment opportunities.” I would have focused on job availability rather than development-centric politics, we need development, but at the same time we would have done everything to increase productivity, and provide employment opportunities.
News English Title: Congress leader Rahul Gandhi target Modi govt over impact of lockdown news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC