22 January 2025 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

राम मंदिरच्या भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांचं ट्विट...नेमकं काय म्हटलं?

Congress leader Rahul Gandhi, tweet, PM Narendra Modi, Bhoomi Pujan, Ram Mandir, Ayodhya

अयोध्या, ५ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भूमिपूजनापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर वृक्षारोपणही केलं.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘राम प्रेम हैं. वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते. राम करुणा हैं. वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते. राम न्याय हैं. वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. तत्पूर्वी काल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 

News English Summary: Bhumi Pujan ceremony of Ram Mandir has been held at the hands of Prime Minister Narendra Modi. Former Congress president and MP Rahul Gandhi also expressed his sentiments by tweeting after the ground breaking of the Ram temple.

News English Title: Congress leader Rahul Gandhi tweets after PM Narendra Modi performs Bhoomi Pujan for Ram Mandir at Ayodhya News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x