5 November 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

व्यवसाय करणारी कंपनी देशातील राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करतेय | राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट | राहुल गांधी यांनी ट्विटर अकाउंट ब्लॉक केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्याचे शीर्षक आहे ‘ट्विटर का खतरनाक खेल…’ राहुल म्हणाले आहेत, ‘माझे ट्विटर खाते बंद करून ते राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत. एक कंपनी आमचे राजकारण परिभाषित करण्याला बिझनेस बनवत आहे. एक राजकारणी म्हणून मला ते आवडलेले नाही.

हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. माझे 19 ते 20 मिलियन फॉलोअर आहेत. तुम्ही माझे मत जाणून घेण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेत आहात. ते या गोष्टीला चूक ठरवत आहेत की, ट्विटर एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म आहे. हे खूप धोकादायक आहे. आपल्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. ट्विटर हे भेदभाव करणारे व्यासपीठ बनले आहे.

एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत भाष्य केलं आहे.” एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी म्हटले आहे की, “ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी राजकारण करण्याचं ठरवत आहे.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Rahul Gandhi Twitter Company Define Our Politics news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x