23 February 2025 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राहुल गांधींच्या नैत्रुत्वात विरोधकांची बैठक | 100 खासदार एकवटले | संसदेवर सायकल मार्च

Rahul Gandhi

नवी दिल्ली, ०३ ऑगस्ट | पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.

राहुल गांधींच्या बैठकीत डावे पक्ष, शिवसेना, द्रमुक, राजद, तृणमू काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे उपस्थि होत्या. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेवढे लोक एकत्रित, तितका आवाज शक्तीशाली होईल. त्यामुळे भाजप-आरएसएसला दाबून टाकणे कठीण होईल, असे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले.

सत्ताधारी भाजप आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढतानाच संसदेतही लढाई लढावी लागणार आहे. कोरोनावर चर्चा झाली आहे. तशी पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

दरम्यान, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटत असल्याचंही बोललं जात आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Rahul Gandhi’s breakfast meet with Opposition MPs over parliament session news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x