23 December 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलले म्हणून फेसबुकने त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं | तर भारतीय सत्य बोलले म्हणून #ResignModi....

Congress leader Srivatsa

नवी दिल्ली, २९ एप्रिल | देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि लाखो लोकं आजपर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुक युजर्स #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला.

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. त्यानंतर, काही युजर्संने फेसबुकच्या या हॅशटॅग ब्लॉकच्या घटनेची ट्विटरवरून तक्रार केली. त्यावेळी, हॅशटॅग #ResignModi हा कंटेट आमच्या फेसबुक कम्युनिटी स्टँडर्सच्या विरुद्ध आहे, असा मेसेज युजर्संना दिसत होता. दरम्यान, याप्रकरणी फेसबुककडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

हॅशटॅग ब्लॉक होणे हा तांत्रिक बिघाड असून योगायोग होता. आता, तो हॅशटॅग रिस्टोर म्हणजे पुनर्स्थापित करण्यात आला आहे. भारत सरकारकडून यासंदर्भात कसलेही निर्देश मिळाले नव्हते, असेही फेसबुकच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडून चुकीनं हा हॅशटॅग ब्लॉक झाला होता. दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल अनेकांना नाराजी व्यक्त केलीय.

मात्र फेसबुकच्या दुपट्टी भूमिकेवर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “फेसबुकने अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले म्हणून त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं… ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलले म्हणून त्यांचं अकाउंट ब्लॉक करून टाकलं… आणि भारतात सत्य सांगितलं म्हणून #ResignModi हॅशटॅग डिलीट केला… ही दुपट्टी भूमिका आहे.

 

News English Summary: In America, Facebook and Twitter blocked a US President’s Account for telling LIES. In 🇮🇳 India, Facebook and Twitter block #ResignModi hashtag and delete tweets for telling TRUTH…. Double Standards said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa criticized Facebook double standard on ResignModi hashtag trend in India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x