27 December 2024 7:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

३६ प्रचार सभांसाठी वेळ, पण मोदींना एखाद्या इस्पितळाला भेट देण्यासाठी वेळ नाही?, इतिहासातील निर्दयी पंतप्रधान - काँग्रेस

बंगळुरू, ०८ मे | पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल, तामिळनाडूत टीएमसी-काँग्रेस आघाडी तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता आली आहे. आसाममध्ये भाजपाची सत्ता आली आहे. मागील अनेक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करत पाच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेतल्या होत्या.

देशात कोरोनाची लाट असताना मोदींनी या ५ राज्यांमध्ये तब्बल ३६ प्रचार सभा घेतल्याचे देशाने पाहिलं आहे. विशेष म्हणजे देशात कोरोनामुळे बिकट परिस्थती निर्माण झालेली असताना देशाचे पंतप्रधान कधीही देशातील आरोग्य सेवांचा जमिनीवर जाऊन आढावा घेताना दिसले नाहीत.

त्यालाच अनुसरून काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी मोदींवर तिखट शब्दात टीका केली आहे. या संदर्भात टीका करताना श्रीवत्सा यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘केरळमध्ये 5 रॅली, टीएनमध्ये 7 रॅली, आसाममध्ये 7 रॅली, बंगालमध्ये 17 रॅली. पण पंतप्रधान मोदींनी 1 रूग्णालयाला भेट दिली आहे का? एखाद्या 1 त्रस्त कुटूंबाला भेटले आहेत का ? एखाद्या गरिबाला, मजुराला भेटले आहेत का? एखाद्या कोरोना योध्याची भेट घेतली आहे का ? भारताच्या इतिहासातील मोदी सर्वात निर्दयी पंतप्रधान आहेत’, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: 5 Rallies in Kerala, 7 Rallies in TN, 7 Rallies in Assam, 17 Rallies in Bengal. Has anyone seen PM Modi visit 1 Hospital? 1 suffering Family? 1 poor Labourer? 1 Corona Warrior? Modi is the most heartless Prime Minister in Indian History said Congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa slams PM Narendra Modi for not visiting single hospital in the nation news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x