26 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत

Congress leader Surendra Rajput

नवी दिल्ली, १५ मे | कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हारलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

देशातल्या कोरोना परिस्थितीवरही काल त्यांनी भाष्य केलं. देशातल्या ग्रामीण भागामध्ये करोना फोफावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी कोरोनावर बोलताना मोदी म्हणाले होते की हा व्हायरस एक बहुरूपी असून तो वारंवार आपलं रूप बदलतो आहे, त्यामुळे त्यापासून आपण सावध राहायला हवं असं देखील ते आवर्जून म्हणाले होते.

याच विषयाचा संदर्भ घेत काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी मोदींना नाव न घेता लक्ष केलं आहे. या संदर्भात मोजक्या शब्दात ट्विट करताना सुरेंद्र राजपूत यांनी म्हटलं आहे की, “आपला शत्रू एक बहुरूपी आहे, कपडे बदलून फोटो काढत असतो”.

 

News English Summary: Speaking on Corona this time, Modi had said that the virus is a multi-faceted one and it changes its form frequently, so we should beware of it.

News English Title: Congress leader Surendra Rajput criticized Modi without mentioning his name news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x