23 February 2025 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आपण २१ दिवसांत कोरोनावर मात करू असं मोदी भाषणात म्हणाले होते - राहुल गांधी

Rahul Gandhi, Covid 19, Corona Virus, Lockdown

नवी दिल्ली, २६ मे: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. देशातील विविध राज्यात गेलेले हे मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जात आहेत. दरम्यान, या मजुरांचे होत असलेले हाल पाहून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कमालीचे व्यथित झाले आहेत. दरम्यान, स्थलांतरीत मजुरांबाबत कळवळा व्यक्त केल्याने वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी आज प्रत्युत्तर दिले असून, सरकारने परवानगी दिल्यास मी मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशाला जाईन. एकाच्या नाही १०-१५ जणांच्या बॅगाही उचलेन, असे उदगार राहुल गांधी यांनी काढले आहेत.

मजुरांच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादावर बोलताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला. “आमचा विश्वास उडाला असल्याचं देशातील मजूर म्हणत आहेत. हे असं कुणीही म्हणायला नको. देशात कुणाचाही विश्वास संपायला नको. केंद्र सरकार आजही मजुरांना मदत देऊ शकते. प्रत्येक मजुराच्या खात्यात ७५०० जमा करु शकते. त्याचबरोबर मजूर कुणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही. ते कुठेही जाऊन काम करू शकतात. त्यांना कुणीही रोखू शकत नाही,” असं उत्तर राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलं.

राहुल गांधी यावेळी म्हणाले, पंतप्रधान मोदी आपण २१ दिवसांत कोरोनावर मात करू असे म्हणाले होते. मात्र आता ६० दिवस झाले आहेत. देशभरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. सरकारचा लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल ठरला आहे. त्यामुळे आमची सरकारला विचारण्याची इच्छा आहे, कि आता सरकार पुढे काय करणार?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

संपूर्ण जग लॉकडाउन हटवत असून तिथली कोरोनाची प्रकरणं कमी होत आहेत. परंतु आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशावेळी पंतप्रधान गरीब व शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत? असा प्रश्नही राहुल गांधींनी मोदी सरकारला केला आहे. दरम्यान याआधी देखील केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजवर टीका करत त्यावर सरकारला पुनर्विचार करण्यास सुचवलं होतं.

 

News English Summary: Growing corona virus infections and lockdowns are causing great suffering to poor laborers with stomachs on their hands. These laborers who have gone to different states of the country are going to their native villages by the means they can get. Meanwhile, Congress leader Rahul Gandhi is extremely upset over the plight of these workers.

News English Title: Congress MP Rahul Gandhi Reply To Cm Yogi Adityanath and Union Government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x