काँग्रेसने शेजारी राष्ट्रांसोबत निर्माण केलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले | शेजारी सर्वत्र शत्रू
नवी दिल्ली, २३ सप्टेंबर : कोरोना व्हायरस, देशातील परिस्थिती, भारत-चीन तणाव, अर्थव्यवस्था, कृषि विधेयके यासह विविध मुद्दयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे.
“मोदींनी गेल्या अनेक दशकांमध्ये काँग्रेसने (अनेक देशांबरोबर) निर्माण केलेले चांगले संबंध संपुष्टात आणलेत. आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक आहे” असं एक ट्विट केलं आहे. यासोबतच भारताचे बांगलादेशसोबत बिघडत असलेले संबंध आणि त्यांची चीनशी वाढत असलेली जवळीक यासंबंधीत असलेल्या एका बातमीचा फोटोही पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ”मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला” अशी जोरदार टीका केली होती.
Mr Modi has destroyed the web of relationships that the Congress built and nurtured over several decades.
Living in a neighbourhood with no friends is dangerous. pic.twitter.com/OxGzzHoEYb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 23, 2020
दरम्यान तीन वर्षांपूर्वी २०१७ साली डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आलं होतं. भारताने त्यावेळी चीनची दादागिरी खपवून न घेता कठोर भूमिका घेतली, त्यामुळे चीनला मागे हटावं लागलं. पण त्यानंतर चीनच्या रणनितीक उद्दिष्टांमध्ये मोठा बदल झाला. मागच्या तीन वर्षात चीनने भारताजवळच्या सीमाभागांमध्ये एअर बेस, एअर डिफेन्स सिस्टिम आणि हेलिपॅडची संख्या दुप्पट केली आहे.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तीन हवाई तळ, पाच कायमस्वरूपी हवाई संरक्षण ठाणी आणि पाच हेलिपोर्ट अशी किमान १३ नवी लष्करी ठाणी बांधण्यास सुरुवात केल्याचे ‘स्ट्रॅटफॉर’ या जागतिक सुरक्षा सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. “लडाख सीमावाद सुरु होण्याआधी चीनकडून भारतीय सीमांजवळ लष्करी तळांची उभारणी करण्यात आली. सीमेवरील सध्याचा तणाव म्हणजे सीमा भागांवर नियंत्रण मिळवण्याच्या चीनच्या मोठया रणनितीचा भाग आहे” असे सीम टॅक म्हणाले. ते स्टार्टफॉरचे वरिष्ठ जागतिक विश्लेषक आहेत.
News English Summary: Rahul Gandhi has been constantly criticizing Prime Minister Narendra Modi and the Modi government. Rahul Gandhi has once again attacked the Modi government. He tweeted about it from his Twitter account. Rahul has now accused Modi of ending the ties that the Congress has forged and enhanced over the last several decades.
News English Title: Congress Rahul Gandhi attacks Modi govt over international relations of India Bangladesh Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो