18 November 2024 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

योगी सरकार बेफाम झाले आहे | पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? - काँग्रेसचा सवाल

Congress Sachin Sawant, PM Narendra Modi, Yogi government, Hathras Gangrape

मुंबई, २ ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पाहत आहे अशा शब्दांत काँग्रेसने योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आणि ते दाबण्यासाठी अजयकुमार बिश्त यांचे उत्तर प्रदेश सरकार बेफाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सत्तेने बेधुंद झालेल्या व अहंकारीवृत्तीच्या आदित्यनाथ सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. “उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ज्या पीडित परिवाराला दिलासा दिला पाहिजे त्याऐवजी जिल्हाधिकारी जाऊन त्यांना धमक्या देत आहेत, त्यांचे फोन काढून घेतले जात आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे. हा किळसवाणा प्रकार संपूर्ण देशाने पाहिला आहे. दुसरीकडे पीडित परिवाराला राजकारणीच नव्हे तर माध्यमांनाही भेटू दिले जात नाही. माध्यमांची जाहीर गळचेपी सुरू आहे. त्या छोट्या गावाला एका मोठ्या पोलीस छावणीचे स्वरुप आलेले दिसत आहे.”

“महिला पत्रकारांनाही अत्यंत ह्रद्य शून्यतेची वागणूक दिली जात आहे, हे सर्व महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या खासदारानांही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांनाही पीडित परिवाराला भेटू दिले नाही, हेही देशाने पाहिले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक पीडितेवर बलात्कारच झाला नाही, असा संतापजनक कांगावा करत आहेत. तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी महिला पत्रकारांशी अत्यंत बेजबाबदार व हीन पातळीवर संवाद करत आहेत” अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिला आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आज मुंबईतदेखील उमटले. हाथरसमधील (Hathras) पीडित मुलीवरील पाशवी बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज दुपारी शिवसेनेने (Shivsena) चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणारे आता कुठे गेले? त्यांना उत्तर प्रदेशमधील अराजकता दिसत नाही का? असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी केला.

उत्तर प्रदेशमधील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने यावेळी केली. निषेधाचे फलक हातात घेऊन शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिसांचा निषेध नोंदवला.

 

News English Summary: Today, a girl from a Dalit family was raped and murdered in Hathras and did Prime Minister Narendra Modi become Dhritarashtra when Ajay Kumar Bisht’s Uttar Pradesh government went berserk to suppress it? This question has been asked by Sachin Sawant, General Secretary and Spokesperson of Maharashtra Pradesh Congress Committee.

News English Title: Congress Sachin Sawant slams PM Narendra Modi Uttar Pradesh Yogi government over Hathras Gangrape Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x