ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
मुंबई, १५ मे | देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशातील बड्या शहरांपैकी एक कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथील परिस्थिती खूपच भयावह असल्याचे सांगितले जाते. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मृतदेहांना जमिनीत पुरलेले दिसत होते. काही मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत होते तर काहींवर गरुड व कावळे बसलेले दिसले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीमही येथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू झाले.
कोरोना काळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. सध्या घाई गडबडीत सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे धर्माने हिंदू असलेल्या रुग्णांचे अग्निदहन होण्याऐवजी त्यांना दहन करण्याची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणावर संताप देखील व्यक्त होताना दिसत आहे.
VIDEO | गंगा मातेने वायू-वादळाच्या मदतीने गंगा घाटावरील रेती हटवली आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या कोरोना आपत्तीतील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव देशाला दाखविण्यास सुरूवात केली आहे.
केवळ विचार करा संपूर्ण उत्तर प्रदेशात कोरोनाने परिस्थिती किती भयंकर असेल#UttarPrdesh pic.twitter.com/y3ym8r64VL
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 15, 2021
याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना अतुल लोंढे-पाटील यांनी म्हटलंय की, “५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलणारे मोदी आणि योगी सरकार उत्तर प्रदेशातील जनतेला अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था देखील देऊ शकत नाहीत, ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक
५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था की बात करने वाले मोदी और योगी उत्तर प्रदेश में जनता को दाह संस्कार का भी इंतजाम नहीं कर पा रहे है।
जिसे जलना है उसे दफ़नाया जा रहा है ।अपने आप को हिंदुरक्षक कहते है।
— गांधीदूत-Atul Londhe Patil (@atullondhe) May 15, 2021
News English Summary: Modi and Yogi, who talk about the $ 5 trillion economy, are not able to even arrange for cremation to the public in Uttar Pradesh. The one who is to be burnt is being buried. He is called the Hindurakshak said Congress spokesperson Atul Londhe Patil.
News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil slams BJP govt over many dead bodies found at Ganga ghat news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या