6 January 2025 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

मोदीजी कोरोनाविरोधात ज्या निष्ठेने संघर्ष करत आहेत, तेवढ्याच निष्ठेने RSS स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी लढलेला - काँग्रेस

Congress spokesperson Atul Londhe Patil

मुंबई, १ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.

मृतांच्या आकड्यांविषयी बोलायचे झाले तर जगात सर्वात जास्त मृत्यू भारतामध्येच होत आहेत. काल येथे कोरोनामुळे 3,521 लोकांचा मृत्यू झाला. हा देखील एक विक्रम आहे. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. येथे 828 संक्रमितांनी प्राण गमावले आहेत.

दरम्यान, देशात सर्वत्र ऑक्सिजन, रेमडीसीवीर आणि लसीच्या तुटवड्यामुळे मोदी सरकारवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनाचे सर्व निर्यम पायदळी तुडवत केवळ निवडणुकीच्या प्रचार व्यस्त असल्याचं संपूर्ण देशानं पाहिलं आहे. त्यामुळे कोरोना वेगाने पसरू लागल्याने देशभर आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचं दिसतंय. विदेशातील माध्यमांनी देखील याला मोदीच जवाबदार असल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे मोदी सरकार पूर्ण अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी खोचक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “मोदीजी कोरोनाविरोधात ज्या निष्ठेने संघर्ष करत आहेत, तेवढ्याच निष्ठेने RSS स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी लढलेला”.

 

News English Summary: Modi ji is fighting with corona like same passion, the diligence that the RSS was fought with the British for independence said Congress spokesperson Atul Londhe Patil.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil slams PM Narendra Modi over fight against corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x