7 January 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER
x

2016 मध्ये बँकेबाहेर लाईन, 2020 मध्ये दवाखान्या बाहेर लाईन, 2021 ला स्मशानभूमी बाहेर लाईन...अजब खेळ आहे - काँग्रेस

Congress spokesperson Atul Londhe

मुंबई, २८ एप्रिल | कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु त्यासाठी पुरेशी लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रे बंद करावी लागत आहेत. पुढील महिन्यात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण मर्यादित लोकसंख्येला लस मिळत नसताना लसीकरणाची महामोहीम बारगळणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे.

कोरोना आपत्तीत सामान्य लोकं हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. इस्पितळाच्या बाहेर रांगा, स्मशानभूमीच्या बाहेर रांगा असं चित्र संपूर्ण देशभर पाहायला मिळतंय. याच गंभीर परिस्थितीसोबत सामान्य लोकांचा मागचा अनुभव जोडत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय की, “2016 ला बँकेसमोर लाईनीत उभे राहायला लावले, 2020 ला दवाखान्या समोर लाईनीत 2021 ला स्मशानभूमीत लाईनीत उभे राहायला लावले अजब है तेरा खेल……..?

 

News English Summary: In 2016, he was made to stand in line in front of the bank. 2020 to line up in front of the hospital, 2021 to line up at the cemetery. Your game is weird said congress spokesperson Atul Londhe over corona pandemic in India news updates.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe slams Modi govt over current corona pandemic and past experience of peoples news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x