22 December 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे | मात्र एकही उत्तर नाही - काँग्रेसचा आरोप

congress spokesperson Randeep Surjewala, Modi government, Agriculture Bills, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २० सप्टेंबर : कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. याच दरम्यान विधेयकावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून निशाणा साधला आहे. विधेयकावरून काँग्रेसने सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकार आणत असलेले तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी “शेतकरी विरोधी तीन काळे कायदे भाजप आदेश (व्हिप) काढून मंजूर करेल, पण त्यांच्याकडे एकही उत्तर नाही” असं म्हटलं आहे.

दरम्यान, ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी केली. ही विधेयके मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असं आश्वासन सरकार देतंय का? कृषी क्षेत्रातील या सुधारणांना शेतकऱ्यांचा विरोध का आहे? त्यांच्यावर काठ्या का चालवल्या जात आहेत?, असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

 

News English Summary: A fresh debate over the contentious farm bills broke out in the Rajya Sabha as the Congress asserted that it will “not sign on the death warrant”, on Sunday. The Trinamool Congress, on the other hand, sought to know how many BJP MPs had gained a thorough understanding of the Farmers’ and Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill, 2020 and Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Bill, 2020, which was moved by Union Minister of Agriculture and Farmer Welfare Narendra Singh Tomar in the Upper House.

News English Title: congress spokesperson Randeep Surjewala slams Modi government over agriculture Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x