17 April 2025 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

भाजपच्या मोठ्या मुस्लिम नेत्यांनी केलंय लव्ह विवाह | इतरांनी केला तो लव्ह जिहाद

Congress Spokesperson, Sachin Sawant, Criticized BJP, Love Jihad

मुंबई, २२ नोव्हेंबर: उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.

दरम्यान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत मुक्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांनी केलं तर लव्ह आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने गळे काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा असाही टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहाद विरोधात कायदा आणत आहेत. यामुळे महाराष्ट्रातही असा कायदा आणला जावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

कालच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात देखील आणला जावा अशी मागणी केली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत थोडी तरी लाज बाळगा असंही म्हटलं आहे. मुक्तार अब्बास नक्वी यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केलं तर ते लव्ह आणि इतरांनी केलं तर ते लव्ह जिहाद असं ट्विट करत सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant has criticized the Bharatiya Janata Party (BJP), saying it was done by Muktar Abbas Naqvi and Shahnawaz Hussain, while Love and others did it. Sachin Sawant has also said that those who are embracing love jihad should be a little ashamed. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has started preparations to bring a law against love jihad.

News English Title: Congress Spokesperson Sachin Sawant criticized BJP on Love Jihad Issue News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या