18 April 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

आर्थिक अधोगती, जगात नाचक्की, द्वेष, महागाई आणि बेरोजगारी | मोदी सगळ्यात अपयशी व नापास नेते

PM Narendra Modi

मुंबई, ३० मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.

दुसरीकडे विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या काळातील अपयशच पाढाच वाचला आहे. संजय राऊत सकाळी यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

दरम्यान, मोदी सरकारच्या याच सात वर्षाच्या कार्यकालावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात ट्विट करताना सावंत यांनी म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते आहेत. सपशेल नापास झाले. देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की झाली. संस्थांची विश्वासार्हता व लोकशाही रसातळास गेली. द्वेष,महागाई व बेरोजगारी भयानक वाढली. मोदीमित्र गब्बर व लोक गरीब झाले. ७० वर्षात मिळवले ते ७ वर्षांत गमावले”.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant has strongly attacked the seven-year tenure of the Modi government. In a tweet, Sawant said, “Narendra Modi is the most failed leader. The sapshell has failed. The country’s economy has deteriorated and the world has collapsed. The credibility of institutions and democracy have come to a standstill.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized Modi govt on completion on 7 years news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या