28 December 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | बँक FD 10 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा दर वर्षी देणाऱ्या फंडाची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024
x

देशात चहा भरोसे राजकारण | पण आसाममध्ये मोदी म्हणाले..परदेशात चहाच्या बदनामीचं षडयंत्र

hatched abroad, Defame Indian tea, PM Narendra Modi, Assam Rally

दिसपूर, ०७ फेब्रुवारी: आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौरा करणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी अनेक योजनांचं भूमिपूजन करणार आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे ते एका सभेला संबोधित करणार आहेत.

मोदी ट्विट करत म्हणाले, “आसाममधील जनतेमध्ये मोठा उत्साह पाहून आनंद वाटला. उद्या पुन्हा आसामला जाण्याची संधी मिळाली यामुळे मी खूश आहे. आसामच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही काम करत राहू. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी काही फोटोही शेअर केले आहेत. यांमध्ये आसामच्या लोकांकडून त्यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेली तयारी दिसत आहे.

आसाममध्ये एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील,” असंही त्यांनी नमूद केलं.

आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचंही ते म्हणाले. “हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोजून आता संपूर्ण पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक बोडो करारानंतर नुकतंच बोडोलँड भागातील निवडणुकांनंतर या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे,” असं मोदी यांनी नमूद केलं.

वास्तविक भारतातील राजकारणात चहा हा कधीच चर्चेचा विषय नव्हता. मात्र याच चहावर सत्तेत आल्यापासून मोदींनी “चाय पे चर्चा” शीर्षकाखाली इव्हेंट केले. विषय रेडिओ संबंधित असला तरी कोणी ऐकत नसल्याने त्यासाठी व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करून त्या प्रसार माध्यमांना टीव्ही वाहिनीवर पुरवल्या जाऊ लागल्या. मात्र ज्यावर स्वतः राजकरण केलं त्याच मोदींना सध्या जगावर संशय बालवतोय असं म्हणावं लागेल. वास्तविक आसामच्या निवडणुका जवळ आल्याने चहा पुन्हा केंद्रस्थानी असणार याचा प्रत्यय आला आहे.

 

News English Summary: Addressing a rally in Assam, Modi made a shocking claim. Today, conspirators to discredit the country have reached such a level that they have not given up on India. The conspirators are saying that they want to tarnish the image of Indian tea. Some documents have come to light. This shows that they are trying to attack the tea with which India has its identity, “said Prime Minister Modi. Do you agree with the attackers? India’s tea garden will be the answer to all these political parties. The attacks on Indian tea are not strong enough to deal with these tea workers, “he said.

News English Title: Conspiracy hatched abroad to defame Indian tea said Prime Minister Narendra Modi tells rally in Assam news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x