22 January 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

ऑक्सिजनची पातळी कमी होण्यास कोरोना कारणीभूत, परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी सरकारच जवाबदार - राहुल गांधी

India corona pandemic

नवी दिल्ली, २३ एप्रिल: देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

देशात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, बी. १.६१७ नावाच्या या नव्या विषाणूत असामान्य म्युटेशन ई ४८४ क्यू व एल ४२५ आर आहे. त्याला डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हटले जात आहे. तो वेगाने बाधित करू लागला आहे. परंतु कोरोनाविरोधात मिळालेल्या वेळेचा भारताने अपव्यय केला. म्हणूनच कोरोनाने महाप्रलयाचे रूप धारण केले, असे संशोधकांना वाटते. देशात सध्या सर्वत्र ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवतेय.

याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “ऑक्सिजनची पातळी कमी होण्यास कोरोना कारणीभूत, परंतु ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सच्या तुटवड्याला मोदी सरकारच जवाबदार आहे, असा घणाघात केला आहे.

 

News English Summary: Corona can cause a fall in oxygen level but it is Oxygen Shortage and lack of ICU beds which is causing many deaths is responsibility of Modi govt said Rahul Gandhi news updates

News English Title: Corona can cause a fall in oxygen level but it is Oxygen Shortage and lack of ICU beds which is causing many deaths is responsibility of Modi govt said Rahul Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x