20 April 2025 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

मध्य प्रदेश | वॉर्ड बॉय ऑक्सिजन सपोर्ट काढून घेऊन गेला | कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू

Corona oxygen support

भोपाळ, १६ एप्रिल: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रावर लॉकडाऊनची वेळ ओढावली असली तरी देशातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच देशात 1 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आता हा आकडा थेट 2,00,739 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हे नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा वेग धडकी भरवणारा आहे. एका बाजूला कोरोनासंबंधित औषधांचा आणि लसीचा तुटवडा आहे आणि दुसऱ्या बाजूला इस्पितळांमध्ये धक्कादायक प्रकार घडत आहेत. तसाच प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे.

शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका कोरोना रुग्णांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. रुग्णाची अवस्था गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्याचं निधन झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळंच चित्र समोर आलं. रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव सुरेंद्र होतं. ते रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा दीपकसोबत बोलताना दिसत आहेत.

यानंतर थोड्या वेळानं दीपक निघून जातो आणि सुरेंद्र झोपी जातात. यानंतर तिथे एक वॉर्ड बॉय येतो. तो सुरेंद्र यांच्या बेडजवळ असलेला पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढून नेतो. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुरेंद्र तडफडू लागले आणि ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांना ऑक्सिजन न देण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलानं केला. ‘आधी माझ्या वडिलांना स्ट्रेचरदेखील मिळाला नव्हता. मी त्यांना पाठीवरून आयसीयूमध्ये घेऊन गेलो होतो,’ अशी व्यथा दीपक यांनी मांडली.

 

News English Summary: In Madhya Pradesh A Covid patient died at Shivpuri district hospital allegedly after a ward boy removed oxygen support. The deceased was a dialysis patient & his hemoglobin had dropped. We’ll check CCTV footage and look into the allegations leveled by family said Arjun Lal Sharma

News English Title: Corona patient dies after ward boy removes his oxygen support in Madhya Pradesh hospital news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या