राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार
जयपूर, ०९ मे | देशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान कोणीही अनवाश्यकपणे बाहेर पडल्यास त्याला पोलिसांकडून क्वारंटाइन केले जाणार आहे.
राजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले असून यामधील 5.33 लाख लोक रिकव्हर झाले आहे. राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा 1.99 लाख आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात 17 हजार 987 नवीन प्रकरणे समोर आले असून यामधील 17 हजार 667 लोक बरे झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांत नवीन रुग्णांपेक्षा रिकव्हर होणार्या लोकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेतलाय. गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व परिवारांना मिळणार आहे.
राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना में कोविड-19 के इलाज को भी शामिल किया गया है। इलाज के भारी खर्च से मुक्ति के लिए जल्द से जल्द योजना में रजिस्ट्रेशन करवाएं। https://t.co/zLrtzk1hXY#मुख्यमंत्री_चिरंजीवी_स्वास्थ्य_बीमा_योजना pic.twitter.com/ThflOaO0Tm
— Government of Rajasthan (@RajGovOfficial) May 3, 2021
News English Summary: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot has taken a big decision. The Gehlot government has decided to provide free treatment to Corona patients in all private hospitals in the state under the Chief Minister Chiranjeevi Health Insurance Scheme. The scheme will benefit all the families connected through the Collector.
News English Title: Corona patients will get free treatment in private hospitals in Rajasthan news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY