28 January 2025 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

लस वितरणात भोंगळ कारभार | कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला

Vaccination

भोपाळ, १ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्यानं होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून प्रतिकात्मकरित्या लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 18 ते 44 वर्षांच्या 3.5 लाख लोकांचे लसीकरण केले जाईल. यापूर्वी शुक्रवारी राज्यांच्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मेमध्ये 18 लाख डोस मिळतील, तर राज्यांना 12 कोटी डोसची आवश्यकता आहे.

देशात सर्वच राज्यांमध्ये लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिम लांबल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच लसींच्या वितरणावरून केंद्राचा भोंगळ कारभार देखील समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या नहसिंहपूरमधील करेली बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कोल्ड चेनचा कंटेनर बेवारस अवस्थेत सापडला. हा कंटेनर चालू स्थितीत होता. त्यात कोरोना लसींचे २ लाख ४० हजार डोस होते. एक कंटेनर चालू स्थितीत रस्त्याच्या कडेला बराच वेळ चालू स्थितीत उभा असल्याची माहिती करेली पोलिसांना मिळाली. या कंटेनरमध्ये चालक, वाहक उपस्थित नव्हते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कंटेनरमध्ये असलेली कागदपत्रं तपासली. हा कंटेनर गुरुग्रामच्या टीसीआय कोल्ड चेन सोल्युशन कंपनीच्या मालकीचा असून तो भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचे २ लाख ४० हजार डोस हैदराबादहून पंजाबच्या कर्नालला घेऊन जात असल्याची माहिती कागदपत्रांतून पोलिसांना समजली. कंटेनरमध्ये पोलिसांना ३६४ मोठे खोके आढळले. त्यात कोवॅक्सिन लसींचा साठा होता. त्यांची एकूण किंमत ८ कोटी रुपये इतकी होती. पोलीस सध्या चालकाचा आणि वाहकाचा शोध घेत आहे.

 

News English Summary: A cold chain container was found unattended on the side of the road near Kareli bus stand in Nahsinghpur, Madhya Pradesh. This container was in running condition. It contained 240,000 doses of corona vaccine. Police were informed that a container had been standing on the side of the road for a long time. The driver, carrier was not present in this container. As soon as the police got the information, they rushed to the spot.

News English Title: Corona vaccine loaded cold chain container was found unattended on the side of the road near Kareli bus stand in Nahsinghpur in Madhya Pradesh news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x