25 December 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार भारत ‘डेंजर झोन’मध्ये; पुन्हा लॉकडाउनची शक्यता

Corona Virus, covid 19, Nomura Research

नवी दिल्ली, ११ जून: जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा. तथापि, त्यांनी असंही म्हटलं आहे की, अद्यापही आपली मोठी लोकसंख्या धोक्यात आहे, त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरू शकेल. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात १.०९ आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १.८९ पटीने धोका आहे. अशा परिस्थितीत आपल्याला उपचार आणि औषधे वगळता सर्व खबरदारी घेण्यावर आपला भर असला पाहिजे.

दुसरीकडे डीप नॉलेज ग्रुपने कोरोनाव्हायरसच्या महासाथीत कोणते देश सुरक्षित आहेत, यासाठी २०० देशांचा अभ्यास केला. कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशांनी केलेल प्रयत्न, त्यांनी उचलली पावलं, घेतलेले निर्णय आणि अर्थव्यवस्था यावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे आणि श्रेणीनुसार या देशांची विभागणी करण्यात आली आहे.

पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित २० देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड टॉपवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत ५६ व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे २०० व्या स्थानी आहे

तर जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा करोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

नोमुरानं आपल्या संशोधनात जगातील सर्वात मोठ्या ४५ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची श्रेणी निहाय विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन व तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्यानं दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

 

News English Summary: Japan-based security firm Nomura has studied 45 economies in the country following the outbreak of the corona. It says India is in the ‘danger zone’. There are fears of another Corona outbreak in India, and a lockdown could take effect, Nomura said.

News English Title: Corona virus India Is Among A Group Of 15 High Risk Countries News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x