वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी डॉक्टरांनी मुलीला मोजून ३ मिनिटं दिली
इम्फाळ, ५ जून : देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण २.८२ टक्के आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलीला अंत्यदर्शनासाठी केवळ ३ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांची नजर घडाळ्यावर होती. तिसरा मिनिट पूर्ण होताच मुलीला घेऊन जाण्यात आलं. ही धक्कादायक घटना मणिपूर इथे घडली आहे.
नॉर्थईस्ट टुडे वेबसाइटनुसार २२ वर्षीय अंजली हिमांगटे या तरुणीचे वडिलांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही माहिती मिळाली आहे. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अंजलीला ३ मिनिटांचा वेळ देण्यात आला. यावेळी पीपीई किट घालून वडिलांचं अंत्यदर्शन घेण्याची परवानगी मिळाली.
तरुणी आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेत असल्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तरुणी वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा शेजारी कोणालाही तिच्या जवळच जाण्याची परवानगी नव्हती. मुलगी समोर धाय मोकलून रडत असताना तिच्या आईकडे मात्र पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. यावेळी डॉक्टरांचं सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होतं. तीन मिनिटं पूर्ण होताच डॉक्टरांनी तरुणीला तेथून हलवलं.
तरुणी आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेत असल्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. २५ मे रोजी तरुणी चेन्नई येथून श्रमिक ट्रेनने आपल्या घरी परतली होती. ट्रेनमधील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तरुणाला संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं होतं.
News English Summary: The girl, who was suspected of being a coroner, was kept at the quarantine center in Imphal. At the same time, her father died of a long illness. She was later brought to her home in Manipur. But the young woman was given only three minutes to pay her last respects.
News English Title: Corona virus Manipur Girl Gets 3 Minutes To Say Last Goodbye To Father News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो