10 January 2025 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार

Corona Virus, Marathi News, school reopening NCERT

नवी दिल्ली, १० जून : कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा शाळा महाविद्यालयं सुरु करण्याच्या दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहे. केंद्र सरकारनं (NCRT) पालन आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं या संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

काही दिवसांपासून १५ जूनपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचललं जात आहे. एनसीईआरटीने (NCERT) पालक आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या संदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार शाळा उघडल्यानंतर रोलनंबरच्या आधारे सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येईल. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येईल. शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतराने विद्यार्थ्यांना वेळा ठरवून दिल्या जातील त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल असं म्हटलं आहे.

6 टप्प्यात सुरू होणार शाळा-महाविद्यालयं

  • पहिल्या टप्प्यामध्ये 11 वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत
  • त्यानंतर 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू कऱण्यात येणार आहेत.
  • तिसऱ्या टप्प्यात 2 आठवड्यांनंतर 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील.
  • तीन आठवड्यांनंतर चौथ्या टप्प्यात 3री ते 5वी वर्ग सुरू करण्यात येतील.
  • पाचव्या टप्प्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
  • आठवड्यांनंतर सहाव्या टप्प्यात नर्सरी आणि केजीचे वर्ग परवानगी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येतील. रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील वर्गमात्र ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहणार आहेत.
  • शाळांसाठी विशेष गाइडलाईन असणार
  • 6 फूटांचं अंतर आणि सोशल डिस्टन्सचं पालन करणं बंधनकारक
  • एका वर्गात 30 ते 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असू नयेत.
  • वर्गाचे दारं-खिडक्या उघड्या असाव्यात. सम-विषम रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं.
  • विद्यार्थ्यांच्या जागा बदलू नयेत. रोज त्यांना गृहपाठ देणं आवश्यक आहे.
  • शाळेत प्रवेश केल्यानंतर स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन सर्व प्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे.
  • शाळेतील सर्व गोष्टी, खाण्याचे पदार्थ विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत घेऊन यावेत. कोणालाही शेअर करू नयेत.

 

News English Summary: Schools and colleges were closed due to the corona virus. Now the Central and State Governments are taking steps to start school colleges again. The Central Government (NCRT) has issued some guidelines on compliance and what teachers should keep in mind and what they should follow for the safety of students.

News English Title: Corona Virus Marathi News school reopening NCERT send guidelines draft government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x