15 November 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

देशात कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय | २४ तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

Coronavirus, India, Covid19

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट : गेल्या तीन दिवसात सलग 75 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.

दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणत नवीन रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. सर्वात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनातून बरे होण्याचा दर हा चांगला आहे. भारतात आतापर्यंत 26 लाख 48 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

 

News English Summary: Unlock 4.0, the fourth phase of opening of the economy after coronavirus lockdown, will start from September 1. This phase comes at a time when India’s Covid-19 tally has crossed the 3.46 million mark and the number of deaths due to the disease have gone up to 62,550.

News English Title: Coronavirus 76 thousand new cases found in 24 HRS last from 3 days News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x