अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा | एम्स डॉक्टरांचं आवाहन
नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली दिसून येतेय. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याच्या चर्चांना एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलंय. करोना संक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं दिसून येत असेल तर यामागे लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सोबतच त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचीही पुन्हा एकदा आवर्जुन आठवण करून दिलीय.
प्रदूषणामुळे विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहतात. प्रदूषण आणि व्हायरस दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करतात. कोरोना विषाणूचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नाही. युरोप आणि इतर देशांचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया म्हणाले की, ”मास्कचा वापर करायला हवा. आवश्यक काम नसल्यास घराबाहेर जाऊ नये. जर व्हायरसपासून बचावसाठी खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा प्रसार अजून वाढू शकतो. तरूणाई या व्हायरसच्या प्रसाराबाबत जास्त गंभीर नाही. अनेकजण निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. तरूणांना वाटतं की सौम्य संक्रमण झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या माध्यमातून घरातील वृद्धांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे. ”
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात राज्यात 8,241 जणांनी कोरोनावर मात केली तर 6,190 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही 15,03,050 एवढी झालीय. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16,72,858 एवढी झाली आहे. राज्यात आज 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43,837वर गेला आहे. राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.
News English Summary: AIIMS Director Dr Guleria categorically refuted the rumors that the third wave of corona had started. He said that if there was an increase in cases of corona infection, it was due to the negligence of the people. Speaking to a news channel, Dr. Guleria gave this explanation. He also reminded the citizens to follow the rules of social distance and use masks.
News English Title: Coronavirus Randeep Guleria AIIMS vaccine infection social distancing News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल