21 November 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना रुग्णांच्या आकड्यांमुळे देश हादरला | पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

India corona pandemic

नवी दिल्ली, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत.

ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला बडे अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. थोड्याचवेळात या बैठकीला सुरुवात होणार असून यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

 

News English Summary: The rapidly growing number of corona patients has exacerbated the situation in the country. Against this backdrop, Prime Minister Narendra Modi has convened an important meeting in Delhi on Monday. The meeting is expected to be attended by senior officials and ministers.

News English Title: Coronavirus situation gone worsened PM Narendra Modi called emergency meeting over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x