5 February 2025 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील
x

देश आर्थिक संकटात, पण पंतप्रधान हेडलाईन बनवण्यात व्यस्त: सोनिया गांधी

Sonia Gandhi, Congress, PM Narendra Modi

नवी दिल्ली: देश दिवसागणिक आर्थिक संकटाच्या खाईत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, सभा-समारंभ आणि प्रसिद्धीच्या मोहात पडलेले आहेत. आर्थिक विकासाच्या झालेल्या घसरणीची कबुली देऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारला ती मान्यही नाही ही बाब चिंताजनक आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस ५ ते १५ नोव्हेंबर या काळात देशव्यापी आंदोलन करणार असून त्याच्या तयारीसाठी सोनिया गांधी यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती.

भारतात कृषीव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. काही गोष्टी देशात आयातही केल्या जातात तर काही इथून निर्यातही केल्या जातात. मात्र जर आपल्या देशातील उपलब्ध वस्तू आयात केल्या ज्यांची किंमतही कमी असेल तर इथल्या मालाला मोल्य राहणार नाही, जसं बाजारात गेल्यावर स्वस्त असलेल्या मेड इन चायना वस्तूकडे आपण जास्त आकर्षित होतो. मात्र या स्वस्त मिळणाऱ्या वस्तूंच्या कमी दरांचं कारण आहे त्यांचं सरकार. काही देशांचं सरकार त्यांना कर्ज, निर्यात करणाऱ्यांना सबसिडी उपलब्ध करुन देते त्यामुळे त्यांना इथे स्वस्त दरात वस्तू देणं सोयीचं ठरतं, पण याबाबतीत भारताची स्थिती काहीशी वेगळी आहे. कर्जाचे डोंगर असलेल्या शेतकऱ्यांना आता आयात होणाऱ्या शेतमालाचाही सामना करावा लागणार आहे.

तत्पूर्वी, इस्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेल्या हेरगिरीवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मोदी सरकारनेच इस्रायलच्या ‘पिगॅसस’ सॉफ्टवेअरद्वारे सर्वांची हेरगिरी केली आहे. असं करणं असंविधानिक आहेच, शिवाय लज्जास्पदही आहे,’ अशा शब्दात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

हॅशटॅग्स

#Soniya Gandhi(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x