15 November 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

सावधान! भारतात समूह संसर्गास सुरुवात, इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

India, Covid 19, Corona Virus, Community Spread

नवी दिल्ली, १९ जुलै : गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ६१८ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ लोकांची आतापर्यंत कोरोना टेस्ट झाली आहे. १८ जुलैला ३ लाख ५८ हजार १२७ लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता साडे दहा लाखांच्या वर गेली असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, असे आयएमएने म्हटले आहे. दरम्यान, झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे भारत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले आहे की, ‘देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत, ही परिस्थिती वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. हे वाईट संकेत असून देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.’ त्याचबरोबर ‘दिल्लीत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी पूर्णपणे सावधगिरी बाळगायला हवी आणि केंद्र सरकारची मदत घ्यायला हवी’, असेही त्यांनी म्हटले.

 

News English Summary: The number of corona cases in India has now crossed one and a half million and the Indian Medical Association (IMA) has given alarming information about corona infection in the country. Corona infection has worsened the situation in the country.

News English Title: Covid19 community spread has starts in India says Indian Medical Council News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x