न्यायव्यवस्था, प्रशासन, सैन्यावरील टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही | सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं ते मत

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर : मागील अनेक वर्षांपासून देशभरात कोणत्याही सरकारी टिकेवरून विरोधक आणि सामान्य लोकांवर देखील थेट देशद्रोहसारखे गंभीर लेबल लावण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यात ना सामान्य नागरिक, कलाकार, साहित्यिक आणि राजकीय विरोधक असे सगळेच भरडले गेले आहेत. देशद्रोह सारखे लेबल लावल्याने अनेक तरुणांची आयुष्य उध्वस्थ झाली आहेत. समाज माध्यमांचा त्यासाठी मोठ्या ताकदीने वापर केला गेल्याचे अनेकांनी पाहिलं आहे.
समाज माध्यमांवर तर एक यंत्रणाच त्यासाठी काम करत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यात न्यायालयाचे न्यायाधीश देखील भरडले गेल्याचे यापूर्वी पाहिलं गेलं आहे. दरम्यान, सत्ताधारी सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयांला आहे आणि त्या टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही, असं मत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी व्यक्त केलं होतं. सरकारवरील टीकेला जर देशद्रोह ठरवल्यास यापुढे देशातील परिस्थिती अत्यंत कठीण होईल, अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अहमदाबादमध्ये ८ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात एका कार्यक्रमात त्यांनी वकिलांना संबोधित करताना हे विधान केलं होतं.
प्रलीन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि पी. डी. देसाई स्मृती व्याख्यान समिती यांच्या संयुक्त विद्यमानं गुजरात लॉ सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी त्यांचे रोखठोक विचार मांडले होते. भारतात देशद्रोहाचा कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर गुप्ता उपस्थिताना मार्गदर्शन केले होते. न्यायव्यवस्था, प्रशासन, सैन्यावर केलेल्या टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही. आपण संस्थांवर होणारी टीका बंद करण्याचा प्रयत्न केला, तर बिकट परिस्थिती निर्माण होईल. तो लोकशाहीसाठी धोका असेल, असं गुप्ता म्हणाले होते.
संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व यावेळी गुप्ता यांनी विशद केलं होतं. ‘संविधानानं दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला महत्त्वाचा वाटतो. संविधानानं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र त्यात मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकारदेखील अनुस्यूत आहे. प्रत्येक समाजाचे काही नियम असतात. मात्र त्या समाजातील माणसं जुन्याच नियमांनुसार चालत राहिली, तर त्या समाजाचा विकास खुंटतो,’ असं मत गुप्ता यांनी व्यक्त केलं होतं.
मतांतरातूनच नवे विचारवंत घडतात. त्यामुळे मतभिन्नतेचा आदर करायला हवा, असं न्यायाधीश गुप्ता म्हणाले होते. ‘जर प्रत्येकानं पारंपारिक वाटेनं मार्गक्रमण केलं, तर नव्या वाटा निर्माण होणारच नाहीत. त्यामुळेच नव्या वाटा चोखाळायल्या हव्यात. व्यक्तीनं जुन्या व्यवस्थेविरोधात प्रश्नच उपस्थित केले नाहीत, तर नवी व्यवस्था निर्माणच होऊ शकणार नाही. यामुळे विचारांची क्षितीजं विस्तारणार नाहीत. जुन्या व्यवस्थेला प्रश्न विचारल्यावरच मेंदूची कवाडं खुली होतात आणि नवे विचार निर्माण होतात,’ असं विचार गुप्ता यांनी मांडले होते.
News English Summary: On social media, many have said that only one system is working for it. It has already been seen that the judges of the court were also involved in it. Meanwhile, former Supreme Court judge Deepak Gupta had said that every Indian has the right to criticize the ruling government and that criticism cannot be termed as treason. He also warned that if the criticism of the government was declared treason, the situation in the country would be extremely difficult. He had made this statement while addressing lawyers at an event organized on September 8, 2019 in Ahmedabad.
News English Title: Criticism over government is not sedition says supreme court former judge Deepak Gupta News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल