21 November 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

Dadra Nagar Haveli Election | दादरा नगर हवेलीत प्रचार सभा घेत आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना धोबीपछाड | सेनेचा विजय

Dadra Nagar Haveli Election

दादरा, 02 नोव्हेंबर | दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांची सकाळपासून विजयाच्या दिशेनं घौडदौड सुरू होती. अगदी 18व्या फेरीअखेर कलाबेन डेलकर या 37 हजार मतांनी आघाडीवर होत्या, तर (Dadra Nagar Haveli Election) भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत आले होते.

Dadra Nagar Haveli Election. Shiv Sena’s Kalaben Delkar has won a huge victory. Delkar won by a margin of 50,000 votes. This is Shiv Sena’s first victory outside Maharashtra :

खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिलेली असून, कलाबेन डेलकर यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातजवळील हद्दीत शिवसेनेच्या वाघिणीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला आहे. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.

फडणवीस आणि आदित्य ठाकरेंनी सभा घेत केलेला प्रचार:
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मोठी जवाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे फडणवीसांनी येथे प्रचार सभा घेताना महाराष्ट्राप्रमाणे भ्रष्ट सरकार येथे देखील हवं आहे का? असा प्रश्न भर सभेत उपस्थित केला होता. तर दुसरीकडे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारासाठी प्रचार सभा घेताना गरळ ओकण्यावर दुर्लक्ष करत संयमी पण आक्रमक प्रचंड केला. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या नाहीत पण संपूर्ण जवाबदारी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देण्यात आली होती. अखेर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत धोबीपछाड दिल्याचं निकालातून पाहायला मिळतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dadra Nagar Haveli Election 2021 Shivsena candidate Kalavati Delkar victory.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x