6 January 2025 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

कोरोना आपत्ती | युपी-बिहारनंतर मध्य प्रदेशातील रूंझ नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळले

India corona pandemic

पन्ना, १३ मे | देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.

दुसरीकडे, देशातील उत्तरेकडील राज्य देखोल कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मात्र स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला होता. आता तसाच मध्य प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदापूर गावातील मुळची केन नदीची उपनदी असलेल्या रूंझ नदीत काही मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत की नाही याबाबत माहिती नाही. परंतु असे प्रकार यापूर्वी घडले नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. म्हणून आम्ही गावातील मुलांना नदीत वाहणारे मृतदेह बाहेर काढण्यास मनाई केली आहे. कारण यामुळे गावात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी आम्हाला भीती असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच गावातील लोक यांच नदीचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात.

 

News English Summary: Several bodies have been found floating in a river in Panna district of Madhya Pradesh. The incident has created an atmosphere of fear among the locals. Some bodies are seen floating in the Runz River, a tributary of the original Kane River in Nandapur village. It is unknown at this time what he will do after leaving the post.

News English Title: Dead bodies found in Runz River in Madhya Pradesh during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x