22 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

VIDEO | दीप सिद्धूवरून भाजपा नकार | पण हा पहा त्याचा लोकसभा प्रचारातील व्हिडिओ

Deep Sidhu, Lal Killa, Loksabha Campaigned, BJP candidate Sunny Deol

नवी दिल्ली, २६ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

“दीप सिद्धू हा शीख नसून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे, ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत.” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपने दीप सिद्धू कार्यकर्ता तसेच निवडणूक प्रचारक असल्याचं अमान्य केलं आहे. मात्र वास्तव हे आहे की दीप सिद्धू’ने २०१९ मधील भाजपाचे उमेदवार सनी देओल यांच्यासाठी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला होता आणि भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पंजाबमधील स्थानिक वृत्त वाहिन्यांनी यासंबंधित त्याचं रेकॉडिंग देखील केलं होतं. त्यामुळे या प्रकरणात भाजप उलटं अडकल्याची चर्चा आहे.

 

News English Summary: On the other hand, BJP has denied that Deep Sidhu is an activist as well as an election campaigner. But the fact is that Deep Sidhu had campaigned hard for the 2019 BJP candidate Sunny Deol and had appealed to the BJP to vote. It was also recorded by local news channels in Punjab. Therefore, there is talk that BJP is stuck in this case.

News English Title: Deep Sidhu had campaigned hard for the 2019 BJP candidate Sunny Deol news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x