24 November 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

India China, Ladakha, Defense Minister Rajnath Singh

लडाख, १६ जून: लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.

भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीत असे म्हटले आहे की, ‘सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात डि-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. यावेळी भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. हा विषय शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मोठी बैठक घेत आहेत.’

दरम्यान हा तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे दिल्लीतही घडामोडी वाढल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, वायू सेना, लष्कर आणि नौदल प्रमुख या सर्वांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, चीनच्या बाजूनेही जीवितहानी झाली आहे.

 

News English Summary: The incident took place at a time when efforts were being made to defuse tensions. Defense Minister Rajnath Singh called on External Affairs Minister S. Jaishankar, Chief of Defense Staff General Bipin Rawat, Chief of Air Staff, Army and Navy have all called a meeting.

News English Title: Defense Minister Rajnath Singh called on External Affairs Minister S Jaishankar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x